थंडीच्या दिवसांत आपली त्वचा आणि डोक्याची त्वचा जास्त कोरडी पडते, आणि त्यामुळे कोंड्याचा त्रास वाढतो. हिवाळ्यात कोंड्याचे प्रमाण जरा जास्तच वाढते ज्यामुळे भांग बदलून वेगवेगळ्या हेअरस्टाइल करायची इच्छा निघून जाते. कोंड्यामुळे डोक्यात खाज येते आणि केसांची देखभाल करणे देखील कठीण होते.
जर तुम्हालाही कोंड्याचा त्रास होतो असेल, तर एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. तुम्हाला केवळ दोन साधे घटक लागतील - मेथी दाणे आणि दही!

सोपा घरगुती उपाय:
1) 2 टेबलस्पून मेथी दाणे घ्या आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर करा.
2) या पावडरला अर्धा कप दह्यात ४ तासांसाठी भिजत ठेवा.
3) दही आणि मेथी दाण्यांची पावडर नीट एकत्र करा आणि ते केसांच्या मुळाशी लावा.
4) 30 मिनिटे ते 1 तास थांबा, नंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवा.
ही पद्धत आठवड्यातून दोन वेळा करा, आणि तुम्ही पाहाल की 8 दिवसांत कोंड्याचा त्रास कमी होईल आणि केसांमध्ये चमक येईल.
मेथी दाण्यांमध्ये असलेल्या ॲण्टीफंगल आणि ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे कोंडा कमी होतो, तर दह्यातील लॅक्टोबॅसिलस संसर्ग आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात. तसेच, केसांमध्ये नैसर्गिक चमक येते.
हे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच कोंड्याच्या त्रासापासून मुक्त करेल आणि तुमचे केस बनवतील अधिक सुंदर आणि चमकदार!
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.