Kitchen Cleaning Tips: दिवाळी सण जवळ आला आहे. त्यामुळे सगळेजण घराची साफसफाई करत आहेत. घराची साफसफाई करताना स्वयंपाकघराची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वयंपाकघर घाणेरडे, तेलकट किंवा वास मारणारे (smelly) असेल, तर स्वयंपाक करण्याचा उत्साह कमी होतो. तसेच ते तुमच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते.
किचनची साफसफाई करताना महिलांना अनेकदा वेळ लागतो. जेवण बनवताना भिंतींवर उडणारे तेलाचे डाग, स्टोव्हजवळील काजळी आणि कपाटांवरील धूळ साफ करण्यासाठी काही स्मार्ट आणि सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या किचनला कोणत्याही त्रासाशिवाय झटपट साफ करु शकता.
लिंबू आणि बेकिंग सोड्याने सिंक आणि नळ चमकावा
लिंबूमधील नैसर्गिक ऍसिड आणि बेकिंग सोड्यामध्ये उत्कृष्ट साफसफाईचे गुणधर्म असतात. दोघांना एकत्र मिसळून पेस्ट बनवा आणि ती सिंक किंवा नळावर घासा. 10 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. यामुळे केवळ घाणच नाही, तर वासही दूर होतो.
हेही वाचा: Hand Dryer Health Risk: हँड ड्रायर वापरता का? सार्वजनिक शौचालयातील धोका ऐकून थक्क व्हाल
भिंती आणि फरशांवरील तेलकटपणा काढा
तेलाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर हा एक प्रभावी उपाय आहे. व्हिनेगर गरम पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. हे द्रावण फरशा आणि भिंतींवर स्प्रे करा आणि स्क्रबरने हलक्या हाताने घासून घ्या. तेलाचे डाग काही मिनिटांत निघून जातील.
एक्झॉस्ट फॅनची सफाई
एक्झॉस्ट फॅनवर लवकर घाण जमा होते. ती साफ करण्यासाठी व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि गरम पाणी यांच्या द्रावणात थोडा वेळ भिजवा, नंतर तो ब्रशने घासा. दर 15 दिवसांनी हे केल्यास घाण जमा होणार नाही.
मसाल्याच्या कपाटांची स्वच्छता
मसाला आणि किराणा कपाटांची जागा स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. सांडलेले मसाले आधी कोरड्या ब्रशने किंवा व्हॅक्यूम क्लीनरने काढा. कपाटांमध्ये कापूर ठेवल्यास कीटक येत नाहीत.
फरशी साफ करणे होईल सोपे
फरशी पुसताना तुमचा पारंपरिक क्लीनर वापरण्याची गरज नाही. फरशी पुसताना गरम पाण्यात थोडे व्हिनेगर आणि लिंबूचा रस मिसळा. यामुळे केवळ स्वच्छताच होत नाही, तर स्वयंपाकघर ताजेतवाने राहते आणि जंतूही काढून टाकले जातात.