Wednesday, April 22, 2026 10:38:18 PM

Summer Trip: या उन्हाळ्यात आठवणींचा खजिना जमा करा, देशातील सुंदर ठिकाणांना भेट द्या!

मुलांच्या परीक्षा संपल्या की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची उत्सुकता सगळ्यांनाच लागते. चला तर मग, उन्हाळ्यात भारतात भेट देण्यासाठी काही उत्तम ठिकाणांविषयी जाणून घेऊया.

summer trip या उन्हाळ्यात आठवणींचा खजिना जमा करा देशातील सुंदर ठिकाणांना भेट द्या

Summer Trip: मुलांच्या परीक्षा संपल्या की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची उत्सुकता सगळ्यांनाच लागते. त्यामुळे सुट्टीत कुठे फिरायला जायचे याचा विचार अनेक कुटुंबे करू लागतात. शिमला, मनाली यांसारखी थंड हवेची ठिकाणे लगेच आठवतात. हिमालयातील डोंगररांगा असोत किंवा गोव्याचे सुंदर समुद्रकिनारे, भारतात प्रत्येक प्रकारच्या प्रवाशांसाठी वेगवेगळी पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. उन्हाळा जवळ येत असल्यामुळे उकाड्यापासून थोडा आराम मिळवण्यासाठी सहलीचे नियोजन करणे रिफ्रेशिंग ठरते. चला तर मग, उन्हाळ्यात भारतात भेट देण्यासाठी काही उत्तम ठिकाणांविषयी जाणून घेऊया.

लडाख:  हा उत्तर भारतातील एक नयनरम्य केंद्रशासित प्रदेश आहे, जो त्याच्या विस्तीर्ण पर्वतरांगा, बौद्ध संस्कृती आणि बर्फासाठी प्रसिद्ध आहे

शिमला: उत्तर भारतातील लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून शिमला ओळखले जाते. येथील थंड हवामान आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतात.

ऋषिकेश: उत्तराखंडमधील ऋषिकेश हे आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखले जाते. योग, ध्यान, मंदिरे आणि रिव्हर राफ्टिंगसारख्या साहसी उपक्रमांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

हेही वाचा: Tadoba Tiger Reserve : ताडोबात उन्हाळ्याची चाहूल! सफारीच्या वेळेत बदल; पर्यटकांना नव्या वेळा नोंदवून घेण्याचे आवाहन

दार्जिलिंग: हे पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या कुशीत वसलेले, "टेकड्यांची राणी" म्हणून ओळखले जाणारे एक लोकप्रिय पर्यटन  स्थळ आहे.

गोवा: सुंदर समुद्रकिनारे, उत्साही नाइटलाइफ आणि चविष्ट सीफूड यामुळे गोवा पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे.

उटी: तामिळनाडूमधील उटी हे हिरवाईने नटलेले शांत हिल स्टेशन आहे. येथील धबधबे, बागा आणि थंड वातावरण पर्यटकांना आकर्षित करतात.

जयपूर: जयपूर ‘पिंक सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. भव्य किल्ले, राजवाडे आणि पारंपरिक बाजारपेठा पर्यटकांना आकर्षित करतात.

उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर हे 'तलावांचे शहर' म्हणून ओळखले जाते. भव्य राजवाडे, ऐतिहासिक वास्तू आणि शांत तलाव यामुळे येथील सौंदर्य अधिक खुलून दिसते.


सम्बन्धित सामग्री