मुंबई: भारतात असे अनेक शहरं किंवा गाव आहे, ज्याचं नाव 'पूर' किंवा 'बाद' असतं. उदा. अहमदाबाद, हैदराबाद, गाझियाबाद, कोल्हापूर, सोलापूर, बिजापूर, नागपूर, इत्यादी. मात्र, अनेकदा तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल, की एखाद्या शहराच्या नावामागे 'पूर' किंवा 'बाद' का लिहिले जाते? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
'पूर' शब्द लावण्यामागील ऐतिहासिक कारण
नुकताच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत, असे सांगण्यात आले आहे की, 'पूर हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो. पूर्वीच्या काळात जेव्हा एखादा राजा किंवा महाराजा एखाद्या जमिनीवर राहू लागला किंवा एखाद्या राजाने किल्ला बांधला. तेव्हा त्यांच्या नावासोबत 'पूर' हा शब्द जोडला जात असे. उदाहरणार्थ, जयपूर शहराचे नाव राजा जयसिंह, उदयपूर शहराचे नाव राजा उदयसिंह यांच्या नावावरून ठेवण्यात आले.
हेही वाचा: Unexplored Places: जगातील 'या' 5 रहस्यमय जागा आजही अनभिज्ञ; भारतातील एक बेटही धोक्याचं प्रतीक
'या' कारणामुळे शहरांच्या नावांसोबत 'बाद' शब्द जोडल्या जातात
'बाद' हा शब्द इराण देशातील फारसी भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ 'आबाद' पासून निर्माण झाला आहे. 'बाद' शब्दाचा अर्थ 'वसवलेलं ठिकाण' असा होतो. अनेक शहरांच्या नावासोबत बाद शब्द जोडला जातो. मुघलांच्या काळात हा शब्द अधिक लोकप्रिय झाला. त्या काळात फारसी भाषा प्रशासन आणि संस्कृतीचा एक प्रमुख भाग बनली होती. उदा. हैदराबाद शहराचे नाव मुघल शासक हैदर अलीच्या नावावरून आणि अहमदाबाद शहराचे नाव मुघल राजा अहमद शाहच्या नावावरून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, येणाऱ्या पिढ्यांना राजा किंवा महाराजांची नावे लक्षात राहावीत, म्हणून शहरांच्या नावांसोबत 'पूर' किंवा 'बाद' शब्द जोडले जाऊ लागले.