आरोग्य तज्ज्ञांनुसार, जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर तुम्हाला तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही त्याचे सेवन करत असाल आणि जर तुम्ही आजपासून या सवयी सोडल्या तर, तुम्ही अनेक रोगांचा धोका कायमस्वरूपी कमी करू शकता. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) ची मदत घेऊन तुम्ही यापासून दूर राहू शकता.
तंबाखू आणि धूम्रपान हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक मानले जाते. एका डेटानुसार, 253 दशलक्ष पेक्षा जास्त तंबाखू वापरकर्त्यांसोबत, भारतातदेखील तंबाखू वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तंबाखू आणि धूम्रपानामुळे होणारे आजार आणि त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांमुळे आरोग्य तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.
तंबाखू आणि धूम्रपान यांचा कोणत्याही स्वरूपात वापर करणे हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तंबाखू आणि धूम्रपानामुळे हृदयविकार, श्वास-संबंधित समस्या, त्वचा रोग आणि अनेक प्रकारच्या समस्या वाढवतात. चांगल्या आरोग्यासाठी धूम्रपान, आणि तंबाखूपासून लांब राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे, तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते.
तंबाखूमुळे अनेक आजार वाढतात:
जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, तंबाखू आणि धूम्रपान यांच्या नियमित सेवनामुळे जगभरात दरवर्षी 8 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. तंबाखू आणि धूम्रपानाचा शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात.
हेही वाचा: जगातलं असं ठिकाण जिथे कधीच पाऊस पडत नाही; दिवसा असते भाजून काढणारी उष्णता आणि रात्री पडते हाडे गोठवणारी थंडी!
तंबाखू आणि धूम्रपानामुळे होणारा धोका:
1 - तंबाखूमुळे फुफ्फुस, तोंड, घसा, पचनसंस्था आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
2 - यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
3 - क्रोनिक ब्रॉन्कायटिस, एम्फिसीमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांसारख्या फुफ्फुसांच्या आजारांचे देखील धूम्रपान हे प्रमुख कारण मानले जाते.
4 - तंबाखू आणि धूम्रपानामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते आणि महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो.
धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात होतात सकारात्मक बदल:
1 - आरोग्य तज्ञ म्हणतात, 'धूम्रपान सोडल्याने रक्तदाब कमी होतो आणि फुफ्फुस आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो'.
2 - धूम्रपान सोडल्याच्या एका दिवसात तुमच्या शरीरात अनेक बदल होतात.
3 - धूम्रपान सोडल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होता
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)