महाराष्ट्रातला न सहन होणार उन्हाळा आणि ते गजबजाटातलं वातावरण एकदाचं संपून हिवाळ्याचे दिवस सुरु झाले खरं! मात्र शरीराला जाणवणारा हा गारवा आनंद देतोच पण तो कालांतराने शरीरासाठी घातकही ठरू शकतो म्हणूनच या थंडीचा आस्वाद शरीराची काळजी घेऊन शरीराच्या निरोगीतेसाठी कसा करता येईल जाणून घेऊयात.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. ताज्या फळांची, भाज्यांची, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांची, सुकी फळांची आणि बियांंची विविधता आपल्या शरीराला आवश्यक पोषण मिळवून देते. सुपर सीड्स म्हणजेच फ्लेक्ससीड्स, चिया बिया, तिळ भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, ज्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आणि म्हणून हिवाळ्यात या बियांचा समावेश आपल्या आहारात करावा कारण त्या शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळकट करतात आणि चांगले आरोग्य राखण्यात मदत करतात.
जाणून घ्या 'या' ७ बियांचा आपल्या आरोग्यासाठी असलेला चमत्कारीक फायदा नेमका काय ?
१. तीळ (Sesame Seeds)
फायदे: तिळांमध्ये जास्त , कॅल्शियम, आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडांच्या मजबुतीसाठी, त्वचेसाठी आणि रक्तदाब नियंत्रणासाठी फायदेशीर आहेत.
वापर : तिळाच्या बिया भाजून , चिकट व गोड पदार्थात म्हणजेच गूळ आणि तिळाचे लाडू बनवून खावे किंवा सॅलडमध्ये तिळाचा वापर करावा.
२. चिया बिया (Chia Seeds)
फायदे: चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स, फायबर्स आणि प्रोटीन असतात. हे पचन क्रिया सुधारतात, वजन नियंत्रणात मदत करतात आणि हृदयाचे आरोग्य सुद्धा सुधारते
वापर : चिया बिया पाणी किंवा दूधात भिजवून रात्री ठेवून सकाळी शेक किंवा स्मूदीमध्ये घालून वापरा.
३. आळशी बिया (Flax Seeds)
फायदे: आळशी बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स, आणि फायबर्स असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य आणि पचन तंत्र सुधारते
वापर : आळशी बिया पीसून तयार केलेली पावडर ब्रेड, मफिन्स, आणि सूपमध्ये वापरू शकता.त्याचबरोबर आळशीचे लाडू सुद्धा फार चविष्ट आणि पोषणयुक्त असतात.
४. भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)
फायदे: भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त, लोह, आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे.
वापर : कच्च्या किंवा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया हलक्या नाश्त्याचा पर्याय म्हणून किंवा सॅलडमध्ये घालून खा.
५. सूर्यफूल बिया (Sunflower seeds)
फायदे: सूर्यफूलबिया व्हिटॅमिन E, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ऍसिड्सचा उत्तम स्रोत आहेत. ते त्वचेच्या आरोग्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी लाभकारी आहेत.
वापर : सूर्यफूल बिया नाश्ता किंवादुपारच्या जेवण घालून खा किंवा मिक्स नट्समध्ये एक घटक म्हणून वापरा.
६. मोहरी बिया (Mustard Seeds)
फायदे: मोहरी बिया पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात.
कसा वापरावा: मोहरी बिया शाकाहारी पदार्थ किंवा करीमध्ये टाकून खा. ह्याचा मसाल्यांमध्ये वापर होतो म्हणून विशिष्ट तडक्यासाठी तुम्ही वापरू शकता किंवा मोहरीची पेस्ट करून चटणी किंवा सॉस बनवले जाते.
७. हेम्प बिया (Hemp Seeds)
फायदे: हेम्प बियांमध्ये प्रोटीन, ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीराच्या तंतूंच्या आणि स्नायूंच्या बळकटीसाठी उत्कृष्ट आहेत.
वापर : हेम्प बिया सूप, पराठा , किंवा स्मूदीमध्ये सहजपणे घालू शकता.
बियांचे नियमित सेवन शरीराला आवश्यक पोषण तत्वे प्रदान करतात आणि विविध आजारांपासून संरक्षण देतात. त्यांच्याशी निगडीत असलेल्या फायदेशीर गुणांचा लाभ घेण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आपल्या आहारात समाविष्ट करा जेणे करून हिवाळ्यासहित इतरही ऋतू निरोगी आणि मजेशीर जातील.