Fri. Jun 21st, 2019

लिफ्टमध्येच व्हॅलेंटाईन डे साजरा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

595Shares

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच हैदाराबादमधील मेट्रो स्टेशनवरील दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी उपलब्ध असलेल्या लिफ्टमध्ये तरुणाई अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ चांगलच व्हायरल झाला आहे. स्टेशनवर सीसीटीव्ही लावलेले असतानाही तरुणाई बिंधास्त अश्लील चाळे करताना दिसतात. लिफ्टमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे या तरुणाईला वाटलं आहे. मात्र ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या एमडींनी याची चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याबरोबरच हा सीसीटीव्ही फूटेज व्हायरल कसे झाले हे माहिती काढणे महत्त्वाचं आहे. सीसीटीव्ही ऑपरेट करणाऱ्या कोणी हे केले असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

595Shares

Leave a Reply

%d bloggers like this: