Jaimaharashtra news

निष्पाप मुलीने पोलिस कर्मचार्‍यांसोबत काय केलं

मुंबई : कोरोनामुळे देशाची फार गंभीर आहे. डॉक्टर, पोलीस आणि बॅक कर्मचारी हे त्यांचं कर्तव्य बजावतांना दिसत आहे. सध्या संकटाच्या काळात अनेकजणांनी भारताची मदत करत आहे. कोरोनाविरूद्ध आपले युद्ध सुरु आहे. डॉक्टरांपासून पोलिसांपर्यंत सगळेच साथीच्या रोगा विरूद्ध दिवसरात्र लढा देत आहेत. सर्वसामान्य लोकही आपल्या घरी राहून, सोशल डिस्टंसिंग , तसेच कोरोनाचे गाइड लाईन्स पाळत आहेत. सध्या लोकं घरी असल्यामुळे ते सोशल मीडियावरुन आपले मनोरंजन करत आहेत. या काळात सोशल मीडियावर अनेकजण सक्रिय असल्यानं मीम्स शेअर करत आहेत, तर काही लोकं व्हिडीओ शेअर करुन समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू उमटवत आहेत. अशातच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ज्याने लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओत, पोलीस कोरोना कर्फ्यू दरम्यान आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तेव्हा एक लहान मुलगी आपल्या हातात काठी घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हातात देते. तिचे हे वागणे खूप सोज्वळ आहे. तिचे हे निष्पाप वागणे पाहून लोकांनी या व्हिडीओला खूप पसंत केले. हा व्हिडीओ भारतीय पोलिस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “निष्पाप मुलांना देखील परिस्थितीची जाणीव आहे”. आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर बरेच कमेंट्स देखील येत आहेत.,

Exit mobile version