Jaimaharashtra news

लिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक

लिव्ह-इन-रिलेशन नैतिक किंवा सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य नाही,असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्ते त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपवर मंजुरीचा शिक्का शोधत आहेत, लिव्ह इन रिलेशनशिप नैतिक, तसेच सामाजिकदृष्ट्या मान्य नाही आणि अशा युगलांना संरक्षण दिले जाऊ शकत नाही. असे न्यायालयाने निकालात सांगितले.

पंजाबमधील तारण जिल्ह्यातील पळून जाणा-या एका युगलाने एकत्र जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने दाखल केलेली याचिका न्यायाधीश एच एस मदन यांनी फेटाळली. याचिकाकर्त्यांनी याचिकेत दावा केला, की सध्या ते दोघे एकत्र राहत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहे. मुलीच्या आई-वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची माहितीही न्यायालयाला दिली.

मात्र लिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक असल्याचं सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

Exit mobile version