राज्यात भारनियमनाचे संकट

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यात भारनियमनाची घोषणा केली आहे. राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्र्यांची मुख्यमंत्री निवासावर बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात बुधवारपासून भारनियमन सुरू झाले असून राज्यात भारनियमनाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, राज्यात पाऊस पडला तर भारनियमन कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोळसा आणि विजेमुळे राज्यात भारनियमन आहे. त्यामुळे नागरिकांनी विजेचा वापर काटकसरीने करत काळजी घेण्याचे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.
नितीन राऊत म्हणाले, राज्यात कोळसा आणि विजेमुळे भारनियमनाचे प्रमाण जास्त आहे. केंद्र कोळसा आणायला रेल्वे देत नाही. त्यामुळे राज्यात भारनियमन आणखी किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, असे ते म्हणाले. तसेच राज्यात पाऊस पडला की भारनियमन कमी होईल असेही ते म्हणाले. त्यामुळे नगारिकांनी काळजी घेत वीजेचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, भाजपच्या काळातही भारनियमनाचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र आमच्या काळात भारनियमनाचे प्रमाण कमी आहे. वीजटंचाईमुळे राज्यात भारनियमनाचे संकट ओढवले आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.