Sat. Aug 13th, 2022

अहमदनगरमध्ये नगरसेवकाचा दारु पिऊन धिंगाणा

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

आपल्या प्रभागातील रहिवाशांच्या समस्या सोडवणे हे नगरसेवकाचे काम असते, मात्र अहमदनगरचे नगरसेवकच रहिवाशांसाठी समस्या बनले आहेत.

शिवसेना नगरसेवक सचिन जाधव यांनी आपल्याच प्रभागात दारू पिऊन धिंगाणा घातला आणि तेथील नागरिकांना शिवीगाळ देखील केली.

 

याबाबत नागरिक काही व्यापाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता सचिन जाधव यांनी पोलीस ठाण्यात जाऊन नागरिकांना शिवीगाळ करत

मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.