Tue. Jan 18th, 2022

लोकल खाली येणाऱ्या प्रवाशाला आरपीएफच्या जवानाने वाचवले

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल प्रवाशांसाठी डेथलाइन बनत असून शनिवारी दुपारी चेंबूर स्टेशनवर धावती लोकल पकडताना तोल गेल्यामुळे पडला. मात्र ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने या प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास सीएसटीवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

हार्बर मार्गावरील चेंबूर स्थानकात सीएसटीवरून आलेल्या पनवेल लोकलमध्ये चढताना एका प्रवासीचा तोल गेला.

मात्र ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानाने प्रवाशाचे प्राण वाचवले आहे.

शनिवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांची लोकल चेंबूर स्थानकावर दाखल झाल्यानंतर सर्व प्रवासी उतरले.

मात्र तोपर्यंत लोकल सुरू झाल्यामुळे प्रवाशाचा तोल गेला आणि लोकल खाली आला असताना त्याचे प्राण वाचवले.

हा प्रवाशाचे नाव गिरीराज पांडे (40) असून वडाळा येथील रहिवासी आहेत.

तसेच प्रवाशाचे जीव वाचवणारे आरपीएफ पोलीस रामसिंह असे त्यांचे नाव आहे.

गिरीराज लोकल खाली आले असल्याचे समजताच आरपीएफ पोलिसाने जीव वाचवला.

हा सर्व प्रकार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *