Sat. May 25th, 2019

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

18Shares

रविवारी १७ मार्च रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग आणि हार्बरसह चार मेघा ब्लॉक घेण्यात येणार आहेत.मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर चार तासांचा तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.हार्बरवर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावदरम्यानही ब्लॉक असेल. आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यानही पुलावर गर्डर बसवण्यासाठीही दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे . त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल गाडय़ा उशिराने धावणार आहेत. त्यामुळे मुंंबईकरांनी आज लोकलचा प्रवास सहसा टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक

मुलुंड ते माटुंगा डाऊन धिम्या मार्गावर ११.३० पासून चार तास ब्लॉक

मुलुंड ते माटुंगा ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या जाणार

विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावरील लोकल नाही  थांबणार

कर्जत स्थानकावर सकाळी १०.४० ते दुपारी १.४० पर्यंत  ब्लॉक

आसनगाव ते कसारा अप व डाऊन मार्गावर गर्डर कामासाठी सकाळी १०.५० ते दुपारी १२.५० पर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक.

मुंबई ते भुसावळ ते मुंबई एक्सप्रेस आणि एलटीटी ते मनमाड ते एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द

हार्बर मार्गावर ब्लॉक

कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत ब्लॉक

सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान अप व डाऊन लोकल सेवा रद्द

पनवेल ते वाशी आणि कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार

पश्चिम रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक

बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत जम्बो ब्लॉक

या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर धावणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *