Thu. Oct 21st, 2021

Lock Down : भरघोस उत्पादनानंतरही शेतकरी अडचणीत, टमाटर रस्त्यावर फेकले

कोरोना वायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गरिब, मजूर आणि शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. मात्र दर वाढलेले असले तरीही शेतकरी अडचणीतच आहे.

आंध्र प्रदेशात टमाटर, मिर्ची आणि केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे खरेदीदार भाजी खरेदीसाठी येत नाही आहेत.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पलामनेरु येथील शेतकरी लॉकडाउनमुळे प्रभावित झाले आहेत. टमाट्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आहे.

मात्र खरेदीदार अपेक्षेनुसार नाहीत. दरम्यान लॉकडाउन असतानदेखील शेतकऱ्यांना सवलत देण्यात आली आहे. यामुळे शेतकरी शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाण्याची मुभा आहे.

शेतकरी भितीच्या सावटाखाली

आंध्र प्रदेशातील शेतकरी बाजारपेठेत शेतमाल घेऊन जात आहे. परंतु खरेरीदार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या हंगामात आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणी टमाटरचं विक्रमी उत्पादन झालं आहे. परंतु विक्रमी उत्पादनानंतर देखील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

टमाटर रस्त्यावर फेकले

आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील केळी उत्पादन शेतकऱ्यावर फळांनी भरलेला ट्रक फेकून देण्याची वेळ आली आहे.

या शेतकऱ्याने पोलिसांवर केळयांनी भरलेले वाहन बाजारपेठेत घेऊन जाण्यापासून अडवत असल्याचा आरोप केला आहे. सरकारने शेतमाल खरेदी करुन बाजारपेठेत पोहचवण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *