Lock down : अंत्यविधीसारख्या प्रसंगी ‘इतक्याच’ व्यक्तींना परवानगी

कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली.
या घोषणेनंतर संपूर्ण देशात संचारबंदी सुरु झाली. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी घरात रहावं, असं आवाहन जनतेला करण्यात आलं. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुधारित अधिसूचना जारी केली आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यामध्ये दुर्देवाने जर मृत्यू झाला तर, अंत्यविधीला केवळ २० जणांनाच जाण्याची परवानगी सरकारच्यावतीने दिली आहे.
दरम्यान या अधिसूचनेत राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना वगळण्यात आलं आहे.