Lock Down | गावी जाणाऱ्या मजूरांना औरंगाबादमध्ये पोलिसांनी केलं बंदिस्त

राज्यासह देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. कोरोनामुळे लोकं दहशतीत आहे. यामुळे अनेक जणं आपल्या गावी परतत आहेत. अशाच एकूण 40 जणांना औरंगाबादमध्ये बंदिस्त करण्यात आले आहे.
बंदिस्त करण्यात आलेले मजूर आहेत. या मजूरांची एकूण संख्या 40इतकी आहे. या 40 पैकी काही मजूर हे मुंबईहून-मध्यप्रदेश तर काही जळगावहून सांगलीला जात होते. या मजूरांना पोलिसांनी औरंगाबादेच्या सीमेवर अडवलं.
मुंबईहून मध्यप्रदेश आणि जळगावहून सांगलीला जाणाऱ्या मजूरांना बंदिस्त केलं आहे. या बंदिस्त करण्यात आलेल्या मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र असं असतानाही औरंगाबादेत या मजूरांना बंदिस्त केलं आहे.
गारखेड्यातील पालिकेच्या शाळेत या मजूरांना बंदिस्त केलं आहे. पालिकेच्या शाळेत बंदिस्त करुन शाळेच्या गेटला कुळूप लावण्यात आलं आहे. या शाळेत कोणत्याही प्रकारच्या सोयसुविधा नसल्याचं आढळून आलं आहे.