Lockdown : बांधकाम मजूरांना ५ हजार देणार – मुख्यमंत्री

मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी पुढील २१ दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व भारतीयांना घरात राहण्याचं आवाहन केलं गेलंय. मात्र यामुळे हातावर पोटं असणाऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थितक केला जाऊ लागला.
यावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा बांधकाम कामगारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन दिली आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये ?
या कठीण परिस्थितीत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही दिल्लीतील बांधाकाम मजूरांना ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे या मजुरांचा पुढील काही दिवसांसाठी गुजराण होईल, असं ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे ; जंयत पाटलांचा मोदींवर निशाणा
दरम्यान अरविंज केजरीवाल यांनी २३ मार्चला आणखी एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी घरमालकांना आवाहन केलं होतं.
लॉकडाऊनच्या काळात तुमच्या भाडेकरांकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नसतील तर एक किंवा दोन महिन्याचं घरभाडं हफ्त्यांमध्ये घ्या. या राष्ट्रीय आपत्तीच्या आपण गरिबांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही. ही सर्व आपली जबाबदारी आहे, असंही केजरीवाल म्हणाले होते.