राज्यात १५ मेपर्यंत टाळेबंदी

राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता १४ एप्रिलपासून सरकारने कोरोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे टाळेबंदी असेल की नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

राज्य सरकारने याबाबत आदेश काढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाची पाऊलं उचलताना दिसत आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी पुढे टाळेबंदी वाढवणारच असे संकेत दिले. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम राहतील असं जाहीर केलं आहे.

Exit mobile version