Mon. Dec 6th, 2021

राज्यातील टाळेबंदी १ जूनपर्यंत वाढवली

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे १५ मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र अजूनही कोरोना स्थिती कायम असल्याने आता राज्यातील टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील टाळेबंदी ही १ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं असून यापूर्वी लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम असतील असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच काही नव्या नियमांचाही समावेश करण्यात आला आहे.

राज्यात टाळेबंदी वाढवण्यात आली असून परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करण्याआधी ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं बंधनकारक असणार आहे.

त्यासोबतच राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या काही राज्यांची यादी जाहीर केली होती. त्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांनाही आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच राज्यात प्रवेश मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *