अमरावतीत आठवडाभराची टाळेबंदी

अमरावती जिल्हात कोरोना रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने अमरावती मनपा, अचलपूर मनपा क्षेत्रात तसेच जिल्ह्यातील ९ गावांमध्ये सोमवार रात्री ८ वाजल्यापासून टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे एक आठवडा म्हणजेच १ मार्चपर्यंत ही टाळेबंदी असणार आहे, त्यामुळे रात्री ८ वाजल्यापासून अमरावती शहरात टाळेबंदीची अंबलबजावणी झाली आहे. सकाळी खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी उसळली होती आता मात्र टाळेबंदी झाल्याने अमरावती शहरात पुन्हा सन्नाटा पहायला मिळाला. रस्त्यावर पुन्हा निरव शांतता होती तर विनाकारण फिरणाऱ्याची संख्या ही कमी झालेली पाहायला मिळाली त्यामुळे अमरावतीकरांनी या टाळेबंदीला चांगला प्रतिसाद दिला आहे.