Wed. Aug 4th, 2021

महाराष्ट्राशेजारील आणखी २ राज्यांमध्ये  टाळेबंदी

देशातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेताकाही ठिकाणी शनिवार आणि रविवार टाळेबंदी आणि नाईटकर्फ्यू घोषित केला गेला आहे. गोव्यात बुधवारी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे.  २९  एप्रिल रोजी गोव्यात संध्याकाळी ७ पासून ३ मे पर्यत टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. यावेळी आवश्यक सेवा आणि औद्योगिक क्रियाकलापांना परवानगी देण्यात आली. या काळात सार्वजनिक वाहतूकदेखील बंद राहणार आहे.
गुजरातमध्ये कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने अंशतः टाळेबंदी जाहीर करण्यात आलीआहे. बुधवारी रात्री ८ पासून ५ मे पर्यंत मेडिलक, डेअर, रेशन दुकान, भाजीपाला वगळता सर्व दुकाने, मॉल, मल्टिप्लेक्स, मंदिरे, उद्याने, व्यायामशाळा बंद राहणार आहेत. सरकारने विविध समारंभांवर बंदी देखील घातली आहे.
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना, डॉक्टर आणि विविध संघटनांच्या सल्ल्यानुसार सरकारने २८ एप्रिल ते ५ मे या काळात राज्यात टाळेबंदी जाहीर केली आणि आवश्यक सेवा वगळता या सर्व बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादन: सिद्धी भरत पाटील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *