पाकिस्तानातही कोरोनाचा कहर, अनेक भागांत लॉकडाऊन

भारताप्रमाणेच आता पाकिस्तानातही लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. सिंध प्रांतात कोरोनाच्या संशयितांची संख्या वाढल्यामुळे तेथेही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाकिस्तानातही कोरोनाग्रस्तांची संख्या ८७८ च्या वर गेली आहे. त्यामुळे पाकिस्तानातही चिंतेचं वातावरण आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हैदोस घातला आहे. इटली, स्पेनसारख्या देशातही या व्हायरसमुळे अनेक बळी गेले आहेत. अमेरिकेतही राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचं लॉकाऊन घोषित केलं आहे. अशी परिस्थिती पाकिस्तानातही निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.  

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. इराणलगत असणाऱ्या पाकिस्तानच्या सीमांवर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. सिंध प्रांतात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. पाकिस्तानात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आता वाढू लागले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या पाकिस्तानात ८७८ च्या पुढे गेली आहे. पाकिस्तानात यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर करण्याचं ठरलं होतं. मात्र आधीच अर्थव्यवस्था बिघडलेल्या पाकिस्तानात लॉकडून केल्यास अनेकांवर उपाशी मरण्याची वेळ येईल, ही शक्यता लक्षात घेऊन लॉकडाऊन जाहीर करण्यात येत नव्हता. मात्र इम्रान खान यांनी आता पंजाब, बलुचिस्तान, गिल्गिट- बल्टिस्तान, खैबर-पख्तुनिस्तान आणि पाकव्यप्त काश्मिरमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

सर्वांत आधी सिंधमध्ये लॉकडाऊन केलं गेलं. पाकिस्तान गृहमंत्रालयाने लष्कराच्या सहाय्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Exit mobile version