#LockDown | मशीदीत सामुहिक नमाज पठण करणारे पोलिसांच्या ताब्यात

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जनतेला एकत्र न येण्याचं तसंच घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं आहे. मात्र हे आवाहन काही अतिशहाण्यांना समजत नसल्याचं दिसून येत आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत मिरजेत सामूहिक नमाज पठण सुरु होतं. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या मशीदीत धआड टाकली. यावेळेस पोलिसांनी मशीदीतून मौलाना आणि इतर ३०-३५ जणांना अटक केली. बरकत मशिदीत दुपारी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी मशिदीत असणाऱ्या सर्वांना ताब्यात घेतलं आहे.
कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं आहे. घरुन नमाज अदा करण्याचं आवाहन मुस्लिम नेते तसेच मंत्र्यांकडून केलं जात आहे. तरीही काही बिनडोकांना कोरोनाचं गांभीर्य लक्षात येत नाहीये.
दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवेसंदिवस वाढ होत आहे. दररोज वाढणारा कोरोनाचा आकडा हा चिंतेची बाब आहे. कोरोना घाबरु नका, पण सतर्क राहण्याचं आवाहन शासनाकडून वारंवार केलं जात आहे.