Tue. Jun 28th, 2022

नाशकातील 200 नागरिक पश्चिम बंगालमध्ये अडकले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे देशातील सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमधील जवळपास २००जण हे पश्चिम बंगालमध्ये अडकले आहेत. हे नागरिक बंगालमधील एका दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते.

मात्र आता १६ एप्रिलपर्यंत देशाभरात वाहकूत सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे हे २००जण हे पश्चिम बंगालमध्ये अडकले आहेत.

१३ मार्चपासून हे पश्चिम बंगालमध्ये अडकले आहेत. दरवर्षी हे भाविक दर्ग्याला भेट देण्यासाठी जातात. नाशिक भद्रकाली येथील आहेत. आम्हाला सुखरुपपणे नाशिकमध्ये आणण्याची सोय करावी, अशी मागणी हे बंगालमध्ये अडकलेले नागरिक करत आहेत.

दरम्यान याप्रकरणी जय महाराष्ट्रने याबाबतीत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांधरे यांच्याशी संपर्क केला.

काय म्हणाले जिल्हाधिकारी ?

नाशिकमधील हे २०० नागरिक बंगालमधील मालढा जिल्ह्यातील एका गावात आहेत. अडकलेल्या नागरिकांची नावं मिळवली आहेत. तेथील स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी मी संपर्क साधत आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांना नाशकात आणनं शक्य नाही. परंतु त्यांची तिथे खाण्यापिण्याची सोय व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.