Sun. Jun 20th, 2021

लोकसभेच्या जागा 543 वरून 1000 कराव्यात – प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : लोकसभा सभागृहाची सभासदसंख्या वाढवण्यासंदर्भात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

लोकसभा सभागृहाची सदस्यसंख्या 543 वरुन 1000 इतकी करण्यात यावं असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले आहेत. सोबतच वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेची सदस्यसंख्या देखील वाढवण्यासंदर्भातही मुखर्जी यांनी वक्तव्य केलं आहे.

प्रणव मुखर्जी सोमवारी अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. त्या वेळेस मुखर्जी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सध्या परिस्थितीत लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्र हे फार मोठं आहे. निवडून आलेल्या सद्स्यांसाठी हे क्षेत्र मोठं असल्याचं मतं यावेळी मुखर्जी यांनी मांडलं.

लोकसभा सभागृहाची क्षमता 1977 साली सुधारित करण्यात आली होती. ही सभागृहाची क्षमता सुधारित करण्यासाठी 1971 साली करण्यात आलेल्या जणगणनेचा संदर्भ घेण्यात आला होता.

त्यावेळेस आपल्या देशाची संख्या ही 55 कोटी इतकी होती. परंतु आता लोकसंख्या ही दुप्पटीने वाढली आहे. त्यामुऴे लोकसभा मतदारसंघ वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी हे महत्त्वाचे कारण आहे.

एका लोकसभा मतदारसंघात साधारणपणे 6-7 विधानसभा मतदारसंघ मोडतात. लोकसभेची कमाल सभासदसंख्या ही 545 इतकी आहे. तर राज्यसभेची सदस्यसंख्या ही 250 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *