Tue. Oct 26th, 2021

समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या 143 व्या जयंतीचा उत्साह

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज  जयंती. 143 व्या जयंतीनिमित्त करवीरनगरीत लेझीम आणि ढोल ताशांच्या नाद घुमतोय.

 

शाहू जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. कसबा वाडा म्हणजे शाहू महाराजांचं जन्मस्थळ.

 

लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले. कोल्हापूर शहरात लक्षवेधी मिरवणुकांचं आयोजन करण्यात आले.

 

70 पेक्षा जास्त तालीम मंडळ, लेझीम मंडळ तसंच ढोल ताशा पथकं यात सहभागी झाले. पोवाडा ही कोल्हापूरची शान. पोवाड्यातूनही शाहू महाराजांना वंदन करण्यात आले.

विविध बँड पथकांनाही या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *