Thu. Dec 12th, 2019

Loksabha 2019: पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादीला धक्का

संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालात भाजप सेना युतीन मोठं यश मिळाल आहे.सातारा,हातकणंगले मतदारसंघ सोपे वाटत असताना या ठिकाणी मोठी चुरस झाली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसलाय.राजू शेट्टी याना पराभव पत्करावा लागला तर सातारामधून जरी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले असले तरी मताधिक्य कमी झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादीची अवस्था

पश्चिम महाराष्ट्रात युती महाआघाडीत अनेक लढती चुरशीच्या होत्या.

यामध्ये बारामती,माढा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर या मतदारसंघांचा समावेश होता.यामधील बारामती वागळता सर्व जागा युतीने जिंकल्या आहेत.

यामध्ये अजून एक जागा शिवसेनेनं जिंकली ती म्हणजे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला.

तर प्रतिष्ठेच्या असणाऱ्या माढा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर याठिकाणी युतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

२०१४ लोकसभा निवडणूक होण्याअगोदार पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता.

पण २०१४ ला मोदी लाटेत भाजपने शिरकाव केला.त्यानंतर आता त्यापेक्षा जास्त जागा पश्चिम महाराष्ट्रात मिळवल्या आहेत.

राज्यात झालेल्या या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील या लढती प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या.

प्रचार दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले.या खर तर मुख्यमंत्री यशस्वी झाले.

तर पवार व काँग्रेसला मोठा फटका बसला.मात्र या निकालामुळे काही महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार अशी चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *