Sat. Oct 16th, 2021

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे.आंबेडकर यांनी केलेल्या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसबरोबरील आघाडीची शक्यता नसल्याचे आता बोलले जात आहे.

काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे आंबेडकर यांच्या उमेदवारीचे यांच्यावर याचा परिणाम होईल अशी चर्चा देखील होत आहे.

तसेच प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरसहित अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितलं जातं आहे. अकोला मतदारसंघाबाबत ते लवकरच निर्णय घेतील असं सांगण्यात येत आहे.

सुशीलकुमार शिंदेच्या अडचणीत वाढ

सोलापूरमधून हि निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.

यामुळे भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सोलापुरात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपाचे शरद बनसोडे यांच्या हातात आहे.मागील ५ वर्षांत बनसोडे यांना आपल्या कामाची छाप पाडता आली नाही. त्यामुळे भाजपासुद्धा आपला उमेदवार बदलू शकतो.

खासदार अमर साबळे आणि गौडगाव मठाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.

त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी यंदाची निवडणूक थोडीफार अनुकूल असल्याचे बोलले जात होते.

मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे मात्र शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *