Wed. Aug 10th, 2022

अहमदनगरमध्ये EVM मशीन फोडले

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात आज 14 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्या पासून ते सायंकाळी 6 च्या दरम्यान हे मतदान होणार आहे.जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड,पुणे, बारामती,अहमदनगर,माढा,सांगली,सातारा,रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदार संघात मतदान होत आहे. अहमदनगरमध्ये शांततेत मतदान सुरू असताना नगर तालुक्यातील बाबुर्डी येथे एका व्यक्तीने EVM मशीन फोडल्याची घटना घडली आहे. हा व्यक्ती खिशातून लोखंडी रॉड घेवून आला होता. तो मतदान करत असताना मोठा आवाज झाल्याने त्याने EVM मशीन फोडल्याचे समजले. पोलीसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याने EVM मशीन का फोडले याचे कारण अद्याप समजलेले नाही. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात परभणी आणि अकोल्यात EVM मशीन फोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. दोन गटात हाणामारी झाल्याने हा प्रकार घडला आहे.

लोखंडी हत्याराने फोडले EVM मशीन

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे.

सकाळी 7 पासून महाराष्ट्रात आज 14 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे.

अहमदनगरमध्ये नगर तालुक्यात बाबुर्डी येथे एका व्यक्तीने EVM मशीन फोडल्याचा प्रकार घडला आहे.

बाबुर्डी येथे हा व्यक्ती खिशातून लोखंडी रॉड घेवून आला होता.

तो मतदान करत असताना मोठा आवाज झाला आणि त्याने EVM मशीन फोडल्याचे समोर आले.

त्याने EVM मशीन का फोडले याचे कारण अजूनही समजलेले नाही.

चोख पोलीस बंदोबस्त असताना असा प्रकार कसा घडला असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात परभणी आणि अकोल्यात EVM मशीन फोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.