Thu. Sep 29th, 2022

या मतदारसंघात रंगतदार लढती, दोन जागा युतीला तर दोन राष्ट्रवादीला

संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या पुणे ,बारामती,शिरूर,मावळ, या लोकसभा मतदारसंघाचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. तर पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालात युतीला चांगलं यश मिळाले. तर पुण्यातील दोन जागा युती तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळवण्यात यश आलं. माढा लोकसभा राष्ट्रवादीकडून मिळवत भाजपने धक्का दिला.

पुण्यात गिरीश बापट विजयी

पश्चिम महाराष्ट्रात युती महाआघाडीत अनेक लढती चुरशीच्या होत्या.

यामध्ये बारामती,माढा, शिरूर,मावळ,या जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या होत्या.

शेवटपर्यंत काँग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता.तर दुसरीकडे भाजपकडे तगडा अनुभवी उमेदवार होता.

महापालिकेतील जवळपास १०० नगरसेवक,आठ आमदार,खासदार एवढी भाजपाची ताकद होती.

भाजपचे गिरीश बापट काँग्रेसच्या मोहनदादा जोशींविरोधात सव्वा तीन लाख मताने निवडून आले.

बारामतीमध्ये  चुरस

पुण्याला लागून असलेल्या बारामती मतदारसंघात मोठी चुरस निर्माण केली.

भाजपकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती.

या ठिकाणी जोरदार ताकद मुख्यमंत्र्यांनी लावली होती. पण सुप्रिया सुळे १लाख ५५ हजार मताने निवडून आल्या.

बारामती पवारांचा बालेकिल्ला या मतदारसंघात गेले अनेक वर्षांपासून शरद पवार,अजित पवार नंतर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामामुळे त्यामुळे त्या निवडून आल्या आहेत.

शिरूर व मावळ  रंगतदार  लढती

शिरूर मध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. डॉ अमोल कोल्हे ५८ हजार ४८३ मताने विजय मिळवला.

स्थनिक प्रश्न,सलग तीन वेळा खासदार,जातीय समीकरणे यामुळे या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजय चौकार मारता आला नाही.

मावळ ज्या ठिकाणी शरद पवार यांचा नातू व अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उमेदवारी दिली.

पवार घराण्यातील उमेदवार असल्याने  निवडणुकीत चुरस निर्माण केली पण  २ लाख १५ हजार मताने पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागला.

या चार मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे निकाल 

१) पुणे
गिरीश बापट – भाजपा विजय – ३ लाख २५ हजार मताने विजय
मोहनदादा जोशी – काँग्रेस पराभूत
२) बारामती
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी विजय- १ लाख ५५ हजार मताने विजय
कांचन कुल – भाजप पराभूत
३) शिरूर
डॉ अमोल कोल्हे – राष्ट्रवादी विजय – ५८ हजार ४८३ मताने विजय
शिवाजीराव आढळराव पाटील – शिवसेना पराभूत
४) मावळ
श्रीरंग बारणे – शिवसेना विजय – २ लाख १५ हजार मतानी विजय
पार्थ पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.