Mon. Jan 24th, 2022

लोकसभेत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला

‘आम्ही भल्यासाठी कठोर निर्णय घेतले’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत भाषण केलं. राजकीय भूकंप येणार असं ऐकलं होतं. मात्र अद्याप कोणताही भूकंप आला नसल्याचे ते म्हणले. तसेच विमान उडवण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही समृद्ध असल्यामुळे विमान उडलेच नाही, असे अनेक टोमणे राहुल गांधींच नाव न घेता मोदींनी यावेळी मारले. राहुल गांधींच्या गळाभेटीवरून पुन्हा एकदा लोकसभेत पंतप्रधान मोदींनी टोला लगावला आहे.

भाषणात मोदी काय म्हणाले ?

भारत आज अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर आहे.

16व्या लोकसभेत सर्वाधिक महिला असल्याचे मोदी म्हणाले.

डिजिटल युगात भारताने आपली मोहोर उमटवली.

मेक इन इंडियामुळे भारत स्वावलंबी झाला.

पूर्ण बहुमताच्या सरकारला जगभरात महत्त्व असतं

गेल्या 5 वर्षात भरतात अनेक नव्या संकल्पना आणल्या

कोणतंही श्रेय न घेता जीएसटी लागू केले

आधार विधेयकाला आम्ही न्यायिक शक्ती दिली

5 वर्षात काळा पैसा, भ्रष्टाचारविरोधात कडक कायदे केले

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता जगभरात साजरी होऊ लागली असल्याचे मोदींनी सांगितले.

संसदेत ‘आँखों की गुस्ताखियाँ’ पहिल्यांदाच अनुभवली असा टोला राहुल गांधींनी लगावला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *