Wed. Jun 19th, 2019

या निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेस राष्ट्रवादीला जबर धक्का

0Shares

२०१४ मधील मोदी लाटेत ज्या मराठवाड्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची आशा जिवंत ठेवली होती, त्याच मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेस राष्ट्रवादीला जबर धक्का देणारे ठरलेत. वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीला विजयापासून वंचित ठेवत नांदेड, परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का दिला. दुसरीकडे भाजपने मराठवाड्यात मोठा शिरकावही केला. गेल्या २० वर्षातील अनेक समीकरणे या निवडणुकीने बदलून टाकले आहेत. शिवाय येणाऱ्या विधानसभेसाठी सर्वांच्या पायाखालची वाळूही सरकवली आहे.

मराठवाड्यात राजकिय धक्के

मराठवाड्यामध्ये शिवसेना- भाजप युतीने २०१४ पेक्षाही दमदार यश मिळवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भुईसपाट केले.

२०१४ च्या मोदी लाटेतही आपलं अस्तित्व कायम टिकवणाऱ्या दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का बसला.

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. तो बालेकिल्ला ढासळला. वंचितच्या माध्यमातून इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला.

जालना लोकसभेमध्ये अपेक्षितपणे रावसाहेब दानवे विजयी झाले. खरेतर त्यांना यावेळी तगडे आव्हान नव्हतेच. काँग्रेसच्या विलास औताडे यांचा सहज पराभव केला.

बीडमधून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंवर मात करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांची बोलतीच बंद केली.

लातूरमध्येही भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव करीत भाजपचा गढ मजबूत केला.

वंचितचा अधिक प्रभाव मराठवाड्यात

काँग्रेसला अर्ध्या मराठवाड्यात चार मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी जवळपास दीड लाखापर्यंतची मते मिळविली.

तीन मतदारसंघात लाख मतांपर्यंतची मजल मारली. साहजिकच, काँग्रेस आघाडी व महायुतीच्या थेट लढतीत वंचित बहुजन आघाडीने चुरस निर्माण केली.

लक्षवेधक मते घेताना काँग्रेस आघाडीच्या व्होट बँकेवरच वंचितने घाला घातला.

त्याचा फटका संपूर्ण मराठवाड्यात काँग्रेस आघाडीला आपले खातेही उघडता आले नाही.

याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांत निश्चितच होऊ शकतो हे नक्की आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: