Fri. Jun 21st, 2019

लोणावळ्यातील ‘मगनलाल चिक्की’ होणार बंद!

0Shares

लोणावळा स्टेशनवर उतरल्यापासून सर्वत्र काय दिसतं, तर ‘मगनलाल’ चिक्कीची दुकानं… लोणावळा म्हणजे ‘मगनलाल चिक्की’ हे समीकरण पिढ्यानढ्या आहे. परंतु याच चिक्कीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश ‘मगनलाल फुड प्रोडक्ट्स’ला अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत.

चिक्कीच्या उत्पादनात काही त्रुटी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामुळे अन्न आणि सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याचं कारण देत उत्पादकांना नोटीस बजावत करवाई करण्यात आली आहे.

फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया’च्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत किंवा स्वताच्या प्रयोगशाळेत विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी होणे आवश्यक असते.

परंतु हीच चूक मगनलाल फुड प्रोडक्ट्सकडून करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत खाद्यपदार्थांची कोणतीही तपासणी केली नसल्याचे समोर आले.

कायद्यानुसार उत्पादन आणि अटींची पुर्तता करण्यात आली तरच खाद्यपदार्थांची विक्री करता येईल. अन्यथा अन्न आणि सुरक्षा कायदी कलम 55 नुसार त्रुटींची पुर्तता न केल्यास कंपनी संचालकांवर कारवाई करण्यात येऊन 2 लाख रुपये दंड आकारण्यात येईल असे अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एफडीएचे अधिकारी आर. काकडे यांच्या पथकाने कंपनीचे भागीदार अशोक अगरवाल यांच्या उपस्थितीत केलेल्या तपासणीमध्ये खाद्यपदार्थात काही त्रुटी आढळून आल्या होत्या.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: