Wed. Jun 29th, 2022

जितेंद्र नवलानीच्या विरोधात लूक आऊट नोटीस

व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचा आरोप असेल्या जितेंद्र नवलानीच्या विरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आऊट नोटीस बजावली आहे. नवलानीवर ईडी अधिकाऱ्यांसाठी वसुलीचा आरोप करण्या आला असून तपास यंत्रणांना नवलानी परदेशात फरार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ईडी अधिकाऱ्यांसाठी उद्योजक, व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचा आरोप असलेला जितेंद्र नवलानी परदेशात पळून गेल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात आरोप केले आहेत.

नवलानीला देशाबाहेर पळून जाण्यास मदत – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, जितेंद्र नवलानी देश सोडून पळून गेले आहेत म्हणजेच कुणीतरी या संपूर्ण कटाचे सुत्रधार आहेत. तसेच नवलानीला दशाबाहेर पळून जाण्यास मदत केली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

नवलानी विरोधात पुरावे?

जितेंद्र नवलानीच्या विरोधात लूक आऊट नोटीस.

नवलानीच्या विरोधात एसीबीकडून लूक आऊट नोटीस जारी.

नवलानीवर ईडी अधिकाऱ्यांसाठी वसुलीचा आरोप.

व्यावसायिकांकडून ५९ कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप.

तपास यंत्रणांना नवलानी परदेशात फरार झाल्याचा संशय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नवलानी विरोधात आरोप.

नवलानी विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल.

चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते.

नवलानीच्या काही सहकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.