Wed. May 12th, 2021

यंदाच्या महाशिवरात्रीला भारतीयांनी टाळले पाकिस्तानमधील शिवमंदिर दर्शन

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतात चकवाल जिल्ह्यामधील श्री महादेवाचे कटासराज मंदिर म्हणजे पाकिस्तानी आणि भारतीय हिंदूंचे श्रद्धास्थान.

विशेष  म्हणजे महाशिवरात्रीला येथे भारतीय भाविकांची प्रचंड गर्दी असते.

एक हजार वर्षांहून प्राचीन या मंदिरात यंदा भारतीय भाविक दिसणार नाहीत.

पुलवामा हल्ल्यानंतरचा तणाव पाहता यंदा भारतीय हिंदू भाविकांनी व्हिसाच मागितलेला नाही.

दरवर्षी 200 भारतीयांना हा व्हिसा दिला जातो. लाहोरपासून 280 किमीवर असलेले हे मंदिर व 150 फूट लांब, 90 फूट रुंद पवित्र कुंड स्वच्छ करण्यात आले आहे.

पूर्वी कुंडात मोठ्या प्रमाणात गाळ होता. कंपन्यांमधून येणारी घाणही येथे साचत होती.

पाकिस्तानी हिंदू लोकांनी हा विषय लावून धरल्यानंतर स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं.

भारतातून यंदा 141 भाविकांनी अर्ज केला होता. परंतू नंतर तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हिसा घेण्याचे टाळले.

पाकिस्तानातील केंद्रीय सनातन धर्माच्या संयोजकांनी सांगितले की, 1972 च्या एका करारानुसार दरवर्षी येथे 200 भारतीय भाविक येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *