Jaimaharashtra news

कंत्राटदारांच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

नागपूर ते मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग. २० जिल्ह्यांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. सध्या विदर्भात या महामार्गाच काम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा महामार्ग तयार होत असल्याचं तत्कालीन मुख्यमंत्रांनी सांगितलं होतं..मात्र हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय .शेतकऱ्यांनी महामार्गाबाबत अनेक तक्रारी प्रशासनाला केल्या आहेत. मात्र उदासीन प्रशासन शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यात अपयशी ठरलंय.

महामार्गाच्या कामामुळे धुळ उडत आहे. धुळीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं उद्धवस्थ झाली आहे. प्रशासनाने पंचनामा केला आणि शेतकऱ्यांना तुटपूजी मदत दिली.. महामार्गलगत असलेल्या शेतीच नुकसान केवळ ०.५ आर दाखविण्यात आलं आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे..या संदर्भात पुन्हा पाहणी करून योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या मुरुमाचं देखील अवैध उत्खनन कंत्राटदारानी केलं आहे.अवैध उखनन केल्या प्रकरणी कंत्राटदारांना अमरावती जिल्ह्यात १६ कोटींचा दंड देखील देण्यात आला आहे.

तरी देखील नियमांची पायमल्ली करून उत्खनन करण्यात आलंय. सध्या उत्खनन केलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे..या खड्ड्यांमुळे जीवतहानीसुद्धा होऊ शकतो. कंत्राटदारांनी नियमबाह्य कामे करण्याचा धडाका सुरू केलाय. अशा कंत्रातदारांवर प्रशासन कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त आहेत.समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांच्या चुकीच्या धोरणामुळे पहिल्याच पावसात वाढोना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं आहे तर अनेक शेत खरडून गेली आहेत. यामुळे अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. कंत्राटदारांच्या चुकीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कडू यांनी दिलेत.

Exit mobile version