Mon. Jul 22nd, 2019

नवरदेवाला सोडून नवरी पळाली Boyfriend बरोबर !

0Shares

पाथर्डीत तीन दिवसापूर्वी विवाह झालेली वधू-वराची जोडी लग्न गाठीसह लग्नाच्या वेशात मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा दर्शनासाठी गेली होती. वाहन तळाकडे नवरदेव मोटार सायकल आणायला गेला. आणि नवरीने नवऱ्याच्या हातावर तुरी देत पलायन केले.देवस्थान समितीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील एक नव दांपत्य देवदर्शनासाठी मढीला आले होते.

संबंधित पत्नीच्या मागे दुचाकीवर प्रियकर सुद्धा मढीला आला. नियोजनाप्रमाणे नवरीने नवऱ्याला मोटर सायकल वाहनतळाच्या एका बाजूला लांब लावायला सांगितले.

बायकोचा आग्रह न मोडता नवऱ्याने गाडी देवस्थान वाहनतळच्या आतील बाजूस कोपऱ्यात लावली.

गडाच्या पायऱ्या उतरताना नवरा पुढे नवरी मागे अन काही अंतरावर प्रियकर पायऱ्या उतरत होता.

नियोजनाप्रमाणे नवरी वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर थांबली. नवरा गाडी आणण्यासाठी आत गेला. त्या दरम्यान मागून आलेली नवरी मोटरसायकलवर चटकन बसून जोडीदाराला मागे ठेवत नवरीने जुन्या जोडीदारासोबत नव्या जोडीने धूम ठोकली.

दोन मिनिटांनी गाडी घेऊन नवरदेव नवरीला सोडलं त्या प्रवेशद्वाराजवळ आला. चोहीकडे नजर फिरवली त्याला ती दिसली नाही.

त्याने नातेवाईकांना फोन लावले .त्यांच्या भाषेत नवरी पळून गेल्याचे सांगितले. नवरदेव व नातेवाईकांनी सीसीटीवी फुटेज बघून चेहरा न दिसणाऱ्या प्रियकराला ओळखले.

नव वधू आणि तिचा पती कानिफनाथ गडावर दर्शन करत असतांना नव वधूचा प्रियकर त्यांच्या मागावर होता. दर्शन करून नवी जोडी मंदिर गाभाऱ्याच्या बाहेर येताच वधूचा प्रियकर त्यांच्या मागे होता.

आपला पती पार्किंग केलेल्या वाहन स्थळाकडे गाडी जाण्यासाठी जाताच काही क्षणात फायदा घेत तेथून नववधू आणि तिच्या प्रियकराने मोटार सायकलवर धूम ठोकली.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: