Sun. Mar 29th, 2020

दरमहा सिलेंडरच्या किंमतीत वाढ होणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे बंद होणार असून दरमहा सिलिंडरची किंमत 4 रुपये वाढविण्यात

येणार आहे. 

 

त्यामुळे सामान्य जनतेवर महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे. जीएसटीमुळे गॅस सिलिंडर आधीच महाग झालेत. सिलिंडरवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आला.

 

तसेच नवे कनेक्शन, गॅस तपासणीही महागली. यावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला. मात्र, गॅस सिलिंडरचे अनुदानच बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे

लोकसभेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले.

 

सध्या दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला 12 सिलिंडर सबसिडी दराप्रमाणे दिले जातात. सबसिडीच पूर्णपणे काढून टाकली तर जनतेला विनासबसिडी म्हणजे बाजारभावाप्रमाणे

सिलिंडर खरेदी करावे लागतील. त्यामुळे बँकेत जमा होणारी सबसिडी बंद होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *