Fri. Sep 24th, 2021

लकी नंबरने परिवहन कार्यालय मालामाल

नवीन गाडी घेतांना अनेकजण आपल्या पसंतीचा अथवा व्हिआयपी नंबरची मागणी करतो. अलीकडच्या काळात या फॅड ने सगळ्यांनाच भुरळ घातल्याचे लक्षात येताच परिवहन कार्यालयाने याचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरवून अशा क्रमांकाची सरळ विक्री सुरु केली. गेल्या एका वर्षातच ठाणे परिवहन कार्यालयाने या विक्रीतून तब्बल ७ कोटी १३ लाख ५५ हजार ५००रुपयांची घसघशीत कमाई केली. काही वाहनचालक अंकशास्त्रानुसार नंबर निवडतात तर काही फॅन्सी नंबर प्लेट साठी नंबर निवडतात. जर एखाद्या नंबर साठी एकाहून जास्त अर्ज आले तर त्या नंबराचा लिलाव करून सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला तो बहाल करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *