Fri. Oct 7th, 2022

जनावरांना लम्पीची लागण

जनावरांना होणाऱ्या लंपी आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली असून काही जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या आजारावरील लसीच्या आभावामुळे डोसची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. बाधित जनावरांचे विलगीकरण करण्याचं आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे.

काय आहे लम्पी आजार ?

या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.

लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो.

जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी करतात

हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात.

डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.

पायावर तसेच कानामागे सूज येते.

जनावरे दूध देण्यास कमी पडतात.

जागतिक कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची घोषणा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात सांगितले की, अलीकडच्या काळात अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन डिसीज नावाच्या आजाराने पशुधन प्रभावित झाले आहे. राज्य सरकारांना सोबत घेऊन केंद्र सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी लम्पी त्वचा रोगासाठी स्वदेशी लस तयार केली आहे. लसीकरणाबरोबरच तपासाला गती देऊन आणि जनावरांच्या हालचालींवर नियंत्रण आणून या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२५ पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार आहे असंही पंतप्रधान मोदी कार्यक्रमात म्हणाले.

‘लम्पी’ आजाराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे असेही सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.