Tue. Oct 26th, 2021

नितेश राणेंनी मच्छीमारांविरोधात केलेले आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्गमध्ये आमदार नितेश राणेंनी केलेलं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे असा आरोप अखिल भारतीय मच्छिमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी केला आहे.

 

नितेश राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांबाबत इतका कळवळा होता तर ते आतापर्यंत रस्त्यावर का उतरले नाहीत असा सवालही त्यांनी केला. 

 

यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक मच्छिमारांनाही कर्जमाफी मिळावी अशी मागणीही केली.

 

तांडेल मच्छिमारांच्या मेळाव्यानिमित्त रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

 

दरम्यान अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची गरज असल्याचं वक्तव्य जय महाराष्ट्रच्या न्यूजरुममध्ये नितेश राणेंनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *