Wed. Jun 19th, 2019

कहर! वेड्या फॅनचं ‘असं’ मोदीप्रेम!

0Shares

लोकसभा निवडणुकीत NDA ला मिळालेल्या धमाकेदार यशामध्ये सिंहाचा वाटा आहे, तो अर्थातच नरेंद्र मोदी यांचा. मोदींच्या या विजयाने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. जागोजागी गुलाल उधळून भाजपचा विजय साजरा केला जातोय. मात्र बिहारमध्ये मोदींच्या एका फॅनने मात्र कहर केला आहे. या फॅनने छातीवर चक्क मोदी असं गोंदवून घेतलं. ते ही चाकूने…

मोदींचा वेडा फॅन

नरेंद्र मोदींची क्रेझ देशभरात प्रचंड प्रमाणावर आहे.

बिहारमधील मोतिहारीला राहणाऱ्या सोनू पटेल या फॅनने मात्र कहरच केलाय.

सोनू पटेल याने चक्क आपल्या छातीवर चाकूने मोदी असं लिहिलंय.

आत्तापर्यंत आपल्या प्रेमीकेचं नाव किंवा आवडत्या स्टारचं नाव अशा प्रकारे रक्तबंबाळ होऊन लिहिल्याची उदाहरणं आपण यापूर्वी ऐकली, वाचली असतील. मात्र पंतप्रधानांचं नाव अशा प्रकारे छातीवर चाकून कोरून लिहिणं असं क्वचित घडतं. मात्र सोनू पटेल याने असं केलं आहे.

काय म्हणणं आहे सोनूचं!

नरेंद्र मोदी हे भारताचं भविष्य आहे.

ते माझे भगवान आहेत.

ते माझे आदर्श आहेत.

मीही त्यांच्याप्रमाणे बलिदान द्यायची माझी तयारी आहे, असं सोनूने म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: