ज्योतिरादित्या शिंदे यांचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…
ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मत देण्याचं आवाहन केलं

विधानसभेची पोटनिवडणूकीचा प्रचार हा बिहारप्रमाणे मध्य प्रदेशात देखील जोरदार होत आहे. विधानसभेची पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेसचे माजी नेते मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे प्रचारसभा मध्यप्रदेशात घेत आहेत. एका सभेमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मत देण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर ज्योतिरादित्या शिंदे यांचा हा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आदत से मजबूर । pic.twitter.com/zwPTmB1nzF
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) October 31, 2020
या व्हिडिओत ज्योतिरादित्य शिंदे यांनी हात उंचवत 3 तारखेला होणाऱ्या मतदानात हाताच्या पंजाच्या निशाणी समोरील बटन दाबून काँग्रेसला मात्र त्यानंतर त्यांना चूक समजली अन् भाजपच्या कमळाला मत द्या असं म्हटलं आणि स्वत:ला सांभाळून घेतलं. मात्र त्यांची ही चूक त्यांच्यावर भारी पडल्यासारखी दिसत आहे कारण सोशल मिडियावर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालतेय. नेटकऱ्यानी या व्हिडिओला चांगल धरून ठेवलं आणि यावर अनेकांच्या कमेंट आल्या आहे तर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही या व्हिडिओ ट्विट केलं आणि याला कॅप्शन दिलं ‘आदत से मजबूर’ असं लिहून शिंदे त्यांनी टोला लगावलाय आहे.