जबरदस्तीने मद्य पाजल्यावर फार्महाऊसमध्ये केला तरुणीवर बलात्कार

मध्य प्रदेशच्या शाहडोल जिल्ह्यात रविवारी ही धक्कादायक घटना घडली असून गदाघाट भागातील एका फार्महाऊसमध्ये तरुणीला जबरदस्तीने मद्य पिण्यासाठी भाग पाडले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला या बलात्काराने मध्य प्रदेशमध्ये जनता ही आक्रमक झाली आहे. हा बलात्कार 18 आणि 19 फेब्रुवारीला करण्यात आला, असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितलं आहे. “२० फेब्रुवारीला चारही आरोपी पीडित तरुणीला तिच्या घरासमोर सोडून निघून गेले. तिच्या नातेवाईकांनी नंतर या प्रकरणी तक्रार नोंदवली. आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु आहे” असं मुकेश वैश्य यांनी सांगितलं. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. शिवाय पीडित तरुणी ही 19 वर्षाची असून पीडित तरुणीला सर्वप्रथम जैतपूर येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे.