Fri. Dec 3rd, 2021

भोपाळमधून ‘या’ ‘प्रज्ञासिंह ठाकूरां’चा उमेदवारी अर्ज मागे…

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आश्चर्याचा धक्का बसला असेल, तर थोडं थांबा.. प्रकरण काय आहे ते नीट पाहा. मध्यप्रदेशमधून भोपाळ लोकसभा मतदारसंघामध्ये शहीद करकरे यांच्याविषयी मुक्ताफळं उधळल्यानंतर सध्या चर्चेत असणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशिवाय आणखी एक प्रज्ञासिंह ठाकूर नावाच्या अपक्ष उमेदवार आहेत. या नावाच्या साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या वेळेस मतदानामध्ये घोळ होऊ नये, यासाठी भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. यामुळे अपक्ष उमेदवाराने त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. या अपक्ष उमेदवाराच्या निर्णयामुळे मतदारांना मतदान करताना होणारा गोंधळ टळल्याने भाजपचा जीव भांड्यात पडला आहे.

नावातल्या साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे

मध्यप्रदेशमधून भोपाळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रज्ञासिंह ठाकूर हे भाजपकडून लढत आहेत.

तर प्रज्ञासिंह ठाकूर नावाच्या अपक्ष उमेदवार यासुद्धा भोपाळ लोकसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत.

यासाठी भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांची भेट घेतली होती.

त्यांच्या भेटीनंतर अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

मात्र या दोन्ही नावांच्या साधर्म्यामुळे मतदार राजाची गोंधळ होण्याची दाट शक्यता होती.

त्यांच्या या निर्णयामुळे भाजप पक्षाला मतदानाच्या वेळेस होणाऱ्या गोंधळ टळल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *