निवडणुका कधीही लागू शकतात, कामाला लागा- भाजपचे संकेत
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पिंपरी चिंचवडमधल्या भाजप प्रदेश पदाधिकारी बैठकीत शिवसेनेवर आसूड ओढण्यात आला आहे. निवडणुका कधीही लागू शकतात. स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करा. किती दिवस सोबत जाऊन सत्ता घेणार असा पवित्रा या बैठकीत भाजपकडून पाहायला मिळाला.
शिवसेनेच्या टिकेविरोधातही यात संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. त्यामुळे भाजप आणि शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार की त्यांचा काडीमोड होणार हे स्पष्ट नसलं तरी भाजपनं मात्र एकला चलो रेची भूमिका घेतल्याचं स्पष्ट होतं.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह कोअर कमिटी सदस्य आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित आहेत.