Sun. Aug 25th, 2019

Google Map वर दिसतेय छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा!

0Shares

गुगल मॅपवरून आत्तापर्यंत तुम्ही विविध रस्ते, शहरं, ट्रॅफिक यांचा अंदाज घेतला असेल. मात्र गुगल मॅपमध्ये तुम्ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराज पाहिले आहेत का?

सध्या सोशल मीडियावर गुगल मॅपवर छत्रपती शिवाजी महाराजांचं दिसणारं चित्र व्हायरल होत आहे.

आकाशातून दिसणारी शिवछत्रपतींची प्रतिमा गुगल मॅपवरूनही दिसत आहे.

शिवछत्रपती हे रयतेचे आणि विशेषतः शेतकऱ्यांचा प्रामुख्याने विचार करणारे राजे.

आजही जनतेत शिवाजी महाराजांप्रती निस्सीम भक्ती आहे.

याच प्रेमातून शेतामध्ये शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

लातूरच्या निलंगा तालुक्यांनी महेश निपाणीकर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने ही प्रतिमा तयार केली.

5 एकर जमिनीवर वेगवेगळ्या 2500 किलो पद्धतीच्या बी-बियाण्यांचा वापर करून ही भव्य प्रतिमा तयार करण्यात आली आहे.

निलंगा येथीलच दापता रोड परिसरातील एनडी नाईक यांच्या शेतात निपाणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही प्रतिमा बनवली आहे.

गवताचं प्रतिरोपण करून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.

ड्रोन कॅमेराने शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं चित्रिकरण करण्यात आलं आहे.

गुगल मॅपवरही हिरव्या रंगातील शिवाजी महाराज पाहाता येतात.

यावेळी गवताचं प्रतिरोपण करुन प्रतिमा साकारण्यात आली आहे. सध्या या प्रतिमेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *