Sat. Jun 19th, 2021

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वित्तमंत्री दीपक सावंत यांनी खुशखबर दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडूनसातवा वेतन आयोग करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत होती. आज अखेर विधानपरिषदेत दीपक सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आहे.

या प्रयत्नांनंतर सातवा वेतन लागू झाला – 

  • सरकारी कर्मचारी काही दिवसांपूर्वी संपावर गेले होते.
  • त्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.
  • या संपाच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात मोठी खडाजंगी रंगली होती.
  • संपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संप करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी भूमिका दिवाकर यांनी घेतली तर आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका विनोद तावडे यांनी घेतली. याच्यावर या दोघांमघ्ये खडाजंगी झाली होती.
  • सरकारी कर्मचारी संघटनेत 5 लाख सरकारी, अडीच लाख जिल्हा परिषद, 7 लाख शिक्षक, नगर पालिका आणि महापालिका असे एकूण 17 लाख कर्मचारी संपावर गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *