Jaimaharashtra news

महाडच्या सावित्री नदीवरील अखेर 5 जूनपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला

जय महाराष्ट्र न्यूज, महाड

 

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या महाडच्या सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची आठवण आजही प्रत्येकाच्या मनात ताजी आहे. या नदीवरील नवा पूल 5 जूनपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 

 

गेल्यावर्षी 2 ऑगस्टच्या मध्यरात्री सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता. या अपघातात कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या दोन एसटी नदीत वाहून गेल्या होत्या. त्यापाठोपाठ येणारी काही वाहनेही वाहून गेली होती. 

 

मुसळधार पावसात जवळपास 10 दिवस सुरू असलेल्या शोधकार्यानंतर वाहून गेलेली एसटी आणि प्रवाशांचे मृतदेह सापडले होते. या दुर्घटनेनंतर वर्षभरातच नव्या पुलाचे काम पूर्ण करण्यात सरकारला यश आले आहे.

 

Exit mobile version