कोल्हापूरात महालक्ष्मी रथोत्सव साजरा

दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो. रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर ‘अंबा माता की जय’च्या जयघोषात रथोत्सवाची सुरवात होते. रविवार १७ एप्रिल २०२२ रोजी महालक्ष्मी रथोत्सव सुरुवात झाली. आकर्षक रांगोळ्या, मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृटी, फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा, अंबा माता की जय’चा अखंड गजर, हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सवमूर्ती अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीच्या रथामधून नगरप्रदक्षिणा पार पडली.